What
  • Construction Workers
  • Contractors
  • Equipment Rentals / Sells
  • Home Services
  • Material Suppliers
  • Professional Sevices
  • Real Estate (Property)
Where

Book

Book Cover

“If you Fail to Plan,You Plan to Fail !”

“घर बांधत असताना चार भिंती बांधून उपयोग नाही, तर त्या घराला घरपण असणेही गरजेचे आहे.”

आपले घर हे आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींशी निगडित असते. कारण, कोणतीही व्यक्ती हि तिचा जास्तीत जास्त वेळ आपल्या घरात घालवत असते, त्यामुळे घरातील वातावरणाचा प्रभाव हा त्या व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर होत असतो.  जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि तणावमुक्त आयुष्य जगण्यासाठी आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम असणे गरजेचे असते.
त्यामुळे, घराचे बांधकाम करत असताना काही नैसर्गिक, सामाजिक आणि शास्त्रीय सिद्धांताच्या आधारे आपण दोषमुक्त आणि सकारात्मक ऊर्जा देणारे घर बांधून आपले व परिवारातील सदस्यांचे जीवन यशस्वी आणि तणावमुक्त करू शकतो.

MRP : Rs. 800 /-

Offer Price : Rs. 699 /- only

लेखक :
श्री. स्वप्निल पवार,
(सिव्हिल इंजि.; वास्तू-शास्त्र सल्लागार; व्हॅल्युअर)


Order Now !

Bandhakam-Shastra (INDEX)

पुस्तक लिहिण्यामागील उद्दिष्टय

आजकाल घर या संकल्पनेची व्याख्या म्हणजे, फक्त निवाऱ्यासाठी उभारलेल्या चार भिंती अशी झालेली आहे. परंतु हेच घर आपले आयुष्य यशस्वी आणि तणावमुक्त करण्यात महत्वाची भूमिका बजावत असते. कारण, कोणतीही व्यक्ती हि तिचा जास्तीत जास्त वेळ आपल्या घरी घालवत असते. त्यामुळे त्या घरातील वातावरणाचा प्रभाव हा त्या घरातील व्यक्तीच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर म्हणजेच त्या व्यक्तीच्या जीवनावर होत असतो.
आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी एक तणावमुक्त आयुष्य जगण्यासाठी मानसिक शारीरिक स्वास्थ्य उत्तम असणे गरजेचे असते. यासाठी सर्वप्रथम आपल्या घरातील वातावरण हे नेहमी स्वच्छ, प्रसन्न सकारात्मक ऊर्जा देणारे असावे लागते.
हाच उद्देश समोर ठेऊन, शास्त्रीय, सामाजिक व नैसर्गिक दृष्ट्या दोषमुक्त घर बांधण्याकरिता व तसेच आपले राहते घर विनातोडफोड दोषमुक्त करण्याकरिता नैसर्गिक, सामाजिक व शास्त्रीय सिद्धांताच्या आधारे लिहिलेलं बांधकामशास्त्र – स्वप्नपूर्तीचे एकमेव प्रभावी माध्यम” हे मराठी भाषेतील पुस्तक आपल्या सर्वांसाठी आणले आहे. या पुस्तकाच्या मदतीने तुम्ही तुमचे व तुमच्या परिवारातील सदस्यांचे जीवन यशस्वी व तणावमुक्त कराल हीच अपेक्षा.

प्रकरण : १ – स्वप्न !

तुमच्या आयुष्यातील
सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठीचामास्टर प्लॅन
हा तुमच्याच घरात आहे.

आपल्या आयुष्यातील ही सर्व स्वप्न अथवा ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्याला सुख, शांती, समृद्धी, आरोग्य आणि याचबरोबर आपल्या घरच्या माणसांची साथ गरजेची असते. यांचा प्रत्यक्ष संबंध आपल्या घराशी जोडला जातो. कोणतीही व्यक्ती त्याचा जास्तीत जास्त वेळ घरी घालवत असते आजण याचा सर्व परिणाम हा त्या व्यक्तीवर होत असतो. म्हणजेच घर हे आपल्या आयुष्यातील घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींशी निगडित असते. म्हणून तुमचे घर हेच तुमच्या आयुष्यातील सर्व स्वप्न पूर्ण करण्याचे एकमेव माध्यम आहे. त्यामुळे असे घर मिळवण्यात किंवा बांधण्यात तुम्ही यशस्वी झालात तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील कोणतेही आणि कितीही मोठे ध्येय सहज आणि यशस्वीररत्या पूर्ण करू शकता.  (अधिक माहितीसाठी आजच पुस्तक खरेदी करा)

प्रकरण : २ – वास्तुशास्त्र

विचार बदला, जीवन आपोआप बदलेल.”

वास्तुशास्त्र हे अंधश्रद्धा आणि संकल्पना नसून आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य यात सुधारणा घडवून आणण्यासाठी आपल्या पूर्वजांनी एकत्रित केलेल्या तत्त्वांचा संच आहे. यामधील सर्व तत्त्वे / नियम ही निसर्ग व शास्त्रीय सिद्धांतावर आधारित आहेत.म्हणूनच सन २०१३ मध्ये मंजूर झालेल्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यातून वास्तुशास्त्र हा विषय बाहेर ठेवण्यात आला आहे.
त्यामुळे कोणत्याही प्रकारची वास्तू घेताना अथवा बांधताना वास्तुशास्त्रातील नियमांचे योग्य प्रकारे पालन करून आपण आपले व आपल्या परिवारातील व्यक्तींचे जीवन सुखी बनवू शकतो. त्यासाठी आपल्याला वास्तुशास्त्राचा उगम, परिभाषा, त्यातील नियम व त्यांची शास्त्रीय सिद्धांतावर आधारित कारणे माहित असणे आवश्यक आहे. (अधिक माहितीसाठी आजच पुस्तक खरेदी करा)

महत्वाचे मुद्दे :-
१. वास्तुशास्त्राचा उगम
२. वास्तुशास्त्र कशाप्रकारे काम करते ?
३. दिशा व त्यांचे शुभ – अशुभ परिणाम
४. दोषमुक्त घरकुल
५. वैश्विक शक्तीचा वापर

प्रकरण : 3 – नगररचना (Town-Planning)

घर म्हटले की कुटुंब आले, कुटुंब म्हटलं की समाज आला, समाज म्हटले की नगर आले, आणि जेथे नगर असते तेथे नगरनियोजन असतेच. नगरनियोजनालाच नगररचना किंवा टाउन प्लँनिंग असेही म्हटले जाते. त्यामुळे घर घेताना किंवा बांधताना आपल्याला नगरनियोजन या सामाजिक कल्याणासाठी केलेल्या नियमांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. (अधिक माहितीसाठी आजच पुस्तक खरेदी करा)

महत्वाचे मुद्दे :-
१. नगरनियोजन
२. नगरनियोजनाची आवश्यकता
३. नगररचनेची प्रमुख उद्दिष्टे
४. विकास आराखडा (D.P.)
५. प्रादेशिक आराखडा (R.P.)

प्रकरण : 3.१ – भूमी संपादन (Land Acquisition)

भूमिसंपादन अधिनियम १८९४

या अधिनियमाच्या नावावरून असे लक्षात येते की, हा कायदा १९ वे शतक संपण्यापूर्वी मंजूर झाला आहे. भारतातील पहिला टाऊन प्लांनिंग विषयक कायदा १९१५ साली मंजूर झाला. म्हणजेच भूसंपादन कायदा हा नगर नियोजन कायद्यापेक्षा जुना आहे. १९ व्या शतकात इंग्रज राज्यकर्त्यांनी मोठ्या लष्करी आस्थापनेसाठी जागेची गरज भासत असे. तसेच धरणे बांधणे, रस्ते बांधणे यासाठीही जागेची गरज भासत असे. त्यामुळे त्यांनी भूसंपादनाचा कायदा केला. (अधिक माहितीसाठी आजच पुस्तक खरेदी करा)

महत्वाचे मुद्दे :-
१. भूमिसंपादन अधिनियम १८९४
२. महत्त्वाच्या व्याख्या
३. सार्वजनिक प्रयोजनासाठी भूमिसंपादन प्रक्रिया
४. तातडीचे जमीन संपादन
५. तातडीच्या प्रकरणी वापरावयाचे अधिकार
६. नुकसान भरपाई निर्धारित करताना विचारात घ्यावयाच्या बाबी
७. नुकसान भरपाई निश्चित करताना विचारात न घ्यावयाच्या बाबी
८. न्यायालयाकडे निर्देशन
९. संपादनातून जमीन वगळणे

प्रकरण : 3.२ – बांधकाम – नियम व उपनियम (Building Bye-Laws)

कोणालाही स्वतःच्या मनाप्रमाणे बांधकाम करण्यास इमारतीच्या नियंत्रण नियमांनी बंधन आले आहे. यामध्ये कायदे करणारे केंद्र/ राज्य शासन, अंमलबजावणी करणारी स्थानिक स्वराज्य संस्था, पालन करणारे मध्यस्थ (इंजिनिअर / आर्किटेक्ट / सर्व्हेअर), बांधकाम करणारे ठेकेदार व नागरिक हे पाच महत्वाचे दुवे आहेत. नागरिकांना नियमानुसार इमारती बांधणे, जमिनीचा विकास करणे शक्य व्हावे यासाठी तांत्रिक ज्ञान असलेल्या व्यक्ती (इंजिनिअर / आर्किटेक्ट / सर्व्हेअर) स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत नियुक्त करण्यात येतात. त्यांच्या मार्फतच इमारतींचे नकाशे दाखल केले जातात. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेत असे नकाशे मंजूर करण्यासाठी स्वतंत्र अभियांत्रिकी विभाग असतो. बांधकाम नकाशे तपासणे, ते मान्य करणे, त्यानुसार काम झाले आहे की नाही हे पाहून त्यास प्रथम जोते तपासणी प्रमाणपत्र व त्या नंतर पूर्णत्वाचा दाखला देणे ही कामे बांधकाम नियंत्रण खात्यामार्फत केली जातात. त्याचप्रमाणे बांधकाम परवानगी न घेता बांधलेली बांधकामे, धोकादायक इमारती या नोटीस देऊन पाडणे, अयोग्य प्रकारे चालू असलेली बांधकाम नियंत्रण नियमांना धरून नसलेली बांधकाम थांबविणे इ. कामेही बांधकाम नियंत्रण खात्यामार्फत होतात. (अधिक माहितीसाठी आजच पुस्तक खरेदी करा)

महत्वाचे मुद्दे :-
१. बांधकाम नियमांची किंवा नियंत्रणाची आवश्यकता
२. इमारतीचे वर्गीकरण
३. इमारतीची सुरक्षितता
४. इमारतीचे जोते व त्याची कारणे
५. इमारतीत पायाचे महत्व
६. आरोग्य विषयक इमारतीच्या गरजा
७. मैलापाणी व सांडपाणीसाठी आवश्यकता
८. Commencement, Plinth & Completion Certificate
९. एफ.एस.आय. किंवा एफ.ए.आर. (F.S.I. / F.A.R.)
१०. इमारतींची उंची आणि रस्त्यांची रुंदी यामधील संबंध
११. सेट बॅक (Setback)
१२. उदवाहनाची आवश्यकता (Necessity of Lift)
१३. पावसाच्या पाण्याची साठवण (Rain Water Harvesting)

प्रकरण : ४ – योग्य प्लॉटची निवड

जमीन खरेदी करणे हा बराचसा किचकट व्यवहार समजला जातो. पण त्यातील काही आवश्यक नियमांची माहिती खरेदी करण्याआधी घेऊन आपण खात्रीशीर व्यवहार नक्कीच करू शकतो. प्लॉट खरेदी करताना तो वास्तुशास्त्रानुसार आहे की नाही याची खात्री करून घेणे गरजेचे असते. त्यामुळे  वास्तुशास्त्राची सुरवात प्लॉटच्या खरेदीपासूनच होते, असे म्हटले तर वावगे ठऱणार नाही.
(अधिक माहितीसाठी आजच पुस्तक खरेदी करा)

महत्वाचे मुद्दे :-
१. जमिनीच्या सर्व कायदेशीर बाबी
२. प्लॉटला येणारा रस्ता आणि प्रवेशद्वार
३. प्लॉटचा आकार
४. प्लॉटचा उतार
५. प्लॉटचे कट्स किंवा वाढील बाजू
६. टी-जंक्शन (वीथिशुला)
७. मातीचे परीक्षण
८. हाडे, सापळे अशा भीतीदायक बाबी

प्रकरण : ५ – बांधकाम नकाशे / डिझाइन्स

Failing to Plan
is
Planning  to fail !

बांधकाम करत असताना आपल्याला वेळोवेळी विविध प्रकारच्या नकाशांची/ डिझाइन्सची आवश्यकता असते. उदा. बांधकाम नकाशा (प्लॅन), अंतर्गत संरचना (इंटेरिअर डिझाइन्स), आर.सी.सी. डिझाइन्स, प्लम्बिंग ले-आऊट, इलेक्ट्रिकल ले-आऊट इ. या नकाशांच्या/ डिझाइन्सच्या आधारे आपण आपल्या घराचे बांधकाम करत असतो त्यामुळे हे नकाशे/डिझाइन्स योग्य व बिनचूक असणे खूप महत्त्वाचे असते. (अधिक माहितीसाठी आजच पुस्तक खरेदी करा)

प्रकरण : ५.१ – बांधकाम नकाशा (प्लॅन)

कोणत्याही प्रकारचे बांधकाम करत असताना आपल्याला सर्वप्रथम योग्य बांधकाम नकाशाची आवश्यकता असते. यात इमारतीचे बाह्य सौन्दर्य, इमारतीतील खोल्यांची रचना, मुक्त हालचाल, फर्निचर योजना, सॅनिटरी, प्रकाश योजना, शारीरिक स्वास्थ्य, आरोग्य, कौटुंबिक एकता इ. गोष्टींचा विचार केला जातो. घरातील राहणाऱ्या लोकांची संख्या, कौटुंबिक उत्पन्ने या गोष्टींचा यात महत्वपूर्ण सहभाग असतो. आपल्या घराचे बांधकाम व त्यासाठी लागणारे अन्य नकाशे / डिझाइन्स या नकाशावर आधारित असतात. त्यामुळे बांधकाम नकाशे तयार करत असताना तज्ञ व्यक्तींच्या साहाय्याने बनविणे आवश्यक असते. (अधिक माहितीसाठी आजच पुस्तक खरेदी करा)

महत्वाचे मुद्दे :-
१. बांधकाम नकाशा/ आराखडा तयार करण्यासाठी आवश्यक मुद्दे
२. प्लॉटचे प्रवेशद्वार
३. प्लॉटमधील बांधकामाचे योग्य स्थान
४. बांधकामाचा किंवा घराचा मुख्य दरवाजा
५. बांधकामातील / घरातील खोल्यांची योग्य रचना

प्रकरण : ५.२ – अंतर्गत संरचना (इंटेरिअर डिझाइन्स)

इंटिरिअर डिझाइन हा वरकरणी साधा भासत असला तरी हा गहन विषय आहे. बऱ्याच लोकांना इंटिरिअर करण्याची खूप इच्छा असते, पण इंटिरिअर डिझाइन म्हणजे काय, याची सुतराम कल्पना नसते. बहुतांश लोकांच्या लेखी इंटिरिअर करणे म्हणजे फर्निचर करून घेणे, टाइल्स बदलणे व रंगरंगोटी करणे. अर्थात या गोष्टी इंटिरिअरचा एक भाग आहेच, पण इंटिरिअर डिझाइनमध्ये लेआऊट प्लॅन, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, बजेट मॅनेजमेंट, थीम डिझाइन असे बरेच प्रकार आहेत. (अधिक माहितीसाठी आजच पुस्तक खरेदी करा)[/vc_column_text][/vc_tta_section]

फक्त सिमेंट कॉंक्रिट हे दाब (Compression) सहन करण्याच्या बाबतीत मजबूत असते. परंतु ताण सहन करण्याच्या बाबतीत अगदी कमकुवत असते. कॉंक्रिटमधील ताण सहन न करण्याची ही त्रुटी एम.एस. (M.S.) चे बार्स वापरून दूर केली जाते. कारण पोलादी सळ्या ताण सहन करण्याच्या दृष्टीने मजबूत असतात. तसेच कॉंक्रिट पोलादाला लवकर चिकटून बसते व बंध तयार होतो. त्यामुळे सिमेंट काँक्रीट मिश्रण लोखंडी सळ्या असलेल्या साच्यात ओतून जे बांधकाम केले जाते त्याला आर.सी.सी. म्हणतात. म्हणून याला सलोह सिमेंट काँक्रीट असेही म्हणतात. (अधिक माहितीसाठी आजच पुस्तक खरेदी करा)

महत्वाचे मुद्दे :-
१. आर.सी.सी. डिझाईन
२. आर.सी.सी. डिझाईन बनवताना विचारात घ्यावयाचे मुद्दे
३. सिमेंट काँक्रीट आणि सिमेंट मोर्टार
४. सिमेंट कॉंक्रिटचे घटक एकत्र करण्याच्या पद्धती
५. हार्डनिंग ऑफ सिमेंट
६. काँक्रेटची तराई (Curing of Concrete)
७. काँक्रिटच्या क्युरिंग करण्याच्या पद्धती
८. आर.सी.सी. स्लॅब
९. जमिनीची धारणाशक्ती (Bearing Capacity of Soil)
१०. जमिनीची धारणाशक्ती वाढविण्यासाठी पद्धती
११. सुरक्षा निर्देशांक (Safety Factor )

प्रकरण : ५.४ – प्लम्बिंग आणि इलेक्ट्रिकल ले-आऊट

प्लम्बिंग कामाचा इतिहास हा खूप जुना आहे. सिंधूघाटी सभ्यतांमध्ये याविषयीचे पुरावे मिळाले आहेत. त्या काळातील लोक योग्य प्रकारे पाणी आणण्यासाठी किंवा नेण्यासाठी प्लम्बिंगचा वापर करत होते. तसेच प्लम्बिंग आजही आपल्या घरातील महत्त्वाचा आणि तितकाच दुर्लक्षित केला जाणारा विषय आहे. बरेच वेळा प्लम्बिंग करताना योग्य प्लॅन न बनवता काम केले जाते. व त्यामळे ब्लॉकेजचे व लीकेजचे प्रॉब्लेम्स उद्भवतात. हे प्रॉब्लेम्स लहान असले तरी त्यामुळे होणारे नुकसान हे खूप  जास्त असते.

आपले सौरमंडळ हे विद्युत चुंबकीय तरंगांनी भरलेले आहे. पृथ्वी ही सुद्धा याच सौरमंडळाचा एक ग्रह आहे. पृथ्वी ही सूर्याभोवती परिक्रमा करताना उत्पन्न होणाऱ्या विद्युत चुंबकीय तरंगांनी आपले वातावरण तयार झाले आहे. आपल्या शरीरातील वेगवेगळी कार्ये याच तरंगाच्या माध्यमातून होतात. आपली जीवनशक्ती किंवा चेतनाशक्ती यावर आधारित असते. परंतु आज (D.C.) डायरेक्ट करंटच्या रूपात विद्युतशक्तीचा अविष्कार झाल्यानंतर (A.C.) अल्टरनेटिंग करंट, ११०V,२२०V,४४०V,११०००V, हजारो मेगावोल्ट, मायक्रोवेव्ह, रेडिओ तरंगे याचा शोध लागला.ही तरंगे अदृश्य रूपात आपल्या वातावरणात असतात व आपल्या शरीरावर विपरीत परिणाम करतात. तसेच आपल्या घरात वापरली जाणारी इलेक्ट्रिकल उपकरणे योग्य प्रकारे, योग्य अंतरावर स्थापित न केल्यास त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर व मानसिकतेवर होत असतो. त्यामळे कोणत्याही प्रकारचे विद्युत काम करताना विद्युतयोजना आराखडा बनविणे व विशेष काळजी घेणे गरजेचे असते.
(
अधिक माहितीसाठी आजच पुस्तक खरेदी करा)

प्रकरण : ६ – भारतीय करार कायदा- १८७२

घर घेताना किंवा घराचे बांधकाम करताना आपल्याला अनेक करार करावे लागतात. आणि हे पुस्तक लिहिण्याचे मुख्य ध्येय हेच आहे की, यामार्फत बांधकामाविषयी सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणे. त्यामुळे करार कायद्याविषयी माहिती असणे आवश्यक असते. याद्वारे आपण योग्य प्रकारे करार करून फसवणुकी पासून वाचू शकता व आपले कष्टाने कमाविलेले पैसे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य प्रकारे खर्च करू शकता.

अशा प्रकारे करारांचे नियमन व नियंत्रण करणे हा या कायद्याचा मुख्य हेतू आहे. सदरच्या कायद्याने करार कसे करावेत, त्याची अंमलबजावणी कशी करावी तसेच कायदा मोडल्यास त्याचे परिणाम काय होतील हे सर्व नियमबद्ध केले आहे. करार करणाऱ्या दोन्ही पक्षाच्या जबाबदाऱ्या, हक्क व अटी करारात नमूद केलेल्या असतात. (अधिक माहितीसाठी आजच पुस्तक खरेदी करा)

महत्वाचे मुद्दे :-
१. भारतीय करार कायदा- १८७२
२. इतिहास
३. करार (Contract)
४. ठराव / संविदा (Agreement)
५. प्रस्ताव (Proposal)
६. स्वीकृती (Acceptance)
७. करारांमधील महत्वाचे टप्पे
८. वैध करारासाठी (Valid Contract) आवश्यक मुद्दे
९. व्यर्थ घोषित ठराव (Agreements Declared Void)
१०. करार करण्याची पात्रता(Contractual Capacity of Parties)
११. ठराव(Agreement)आणि करार(Contract)यातील फरक
१२. करार समाप्ती (Termination of Contract)
१३. करारभंग व उपाययोजना

प्रकरण : ७ – १५० वास्तू टिप्स